आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकाणात खळबळ उडाली आहे. या प्रस्तावावरून भाजपने महाविकास आघाडीवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. यावरून आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रामदास आठवले यांनी याबाबत ट्विट केलं आहे. यावेळी त्यांनी एमआयएमला स्वबळावर लढण्याचा सल्ला दिला आहे.
हे ही वाचा : राष्ट्रवादीनं MIM चा प्रस्ताव धुडकावला, आमच्यासाठी विषय संपला- शरद पवार
एम आय एम ची आहे हार्डलाईन त्यामुळे सर्वांनी केले आहे त्यांना साईडलाईन ! एम आय एम शी कोणी युती करीत नसेल तर त्यांनी एकट्याच्या बळावर लढावे., असा सल्ला आठवले यांनी एमआयएम ला दिला.
एम आय एम ची आहे हार्डलाईन
त्यामुळे सर्वांनी केले आहे त्यांना साईडलाईन !
एम आय एम शी कोणी युती करीत नसेल तर त्यांनी एकट्याच्या बळावर लढावे.— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) March 20, 2022
दरम्यान, शरद पवार यांनी मात्र हा प्रस्ताव फेटाळत एमआयएमसोबतच्या महाविकास आघाडीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळं आता दोन दिवस सुरू असलेल्या या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
येत्या काही दिवसात मी, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
एकनाथराव खडसे यांनी भाजपमध्ये अनेक वर्षे राहून मनोरंजनच केलं; रावसाहेब दानवेंचा पलटवार
MIM ची तुम्हाला प्रस्ताव देण्याची हिंमतच कशी होते?; मनसेचा शिवसेनेला सवाल