कदाचित त्यांच्या संस्काराचा तो भाग असावा; शरद पवारांचा नारायण राणेंना टोला

0
505

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोलताना पुन्हा एकदा भाषा घसरली.

‘त्यांचं अॅडव्हाईज कोण, त्यांनाच काही कळत नाही. ते काय आम्हाला अॅडव्हाईज करणार? ते काय डॉक्टर आहेत का? तिसऱ्या लाटेचा कुठून आवाज आला त्यांना? आणि ती पण लहान मुलांना? अपशकुनासारखं बोलू नको म्हणाव. त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणाव. त्या दिवशी नाय का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती., असं राणेंनी म्हटलं होतं. आता या प्रकरणावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

नारायण राणे यांच्यावर मला जास्त काही बोलायचं नाही. ते त्यांच्या पद्धतीने चालत आहेत, कदाचित त्यांच्या संस्कारचा तो भाग असावा, असं म्हणत शरद पवारांनी राणेंवर उपरोधक टोला लगावला. शरद पवार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हा टोला लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अखेर अटक”

सिंहाच्या नव्हे उंदराच्या बिळाखाली येऊन दाखवलं,पण…; राणेंच्या घरासमोर उभं राहून वरुण देसाईंचं चॅलेंज

…पण भाजप नारायण राणेंच्या पूर्णपणे पाठिशी- देवेंद्र फडणवीस

सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका, अन्यथा…; नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here