मुंबई : खासदार संभाजीराजे भोसले यांनी राज्य सरकारला ६ जूनपर्यंत ठोस पावलं उचलण्याचा इशारा दिला असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा सांगितलं. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला पण रस्त्यावर उतरायला पाहिजे”, असं म्हणत चंद्रकांत पाटलंवर टीका केली होती. याला चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मराठा समाजाचे असलेले आरक्षण घालवून समाजाला रस्त्यावर आणल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता आपणच आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवणे दांभिकपणा आहे. माझ्या वक्तव्यावर अजित पवार यांनी उपरोधिकपणे स्वतःच रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवली. असा दांभिकपणा करण्यापेक्षा त्यांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देणे किंवा आधीच्या सरकारप्रमाणे वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून आरक्षण मिळवून देणे यावर भर द्यावा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत आमच्या सरकारप्रमाणे मराठा समाजाला शिक्षण आणि रोजगारासाठी भरघोस सवलती द्याव्यात आणि त्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे. त्यांनी मराठा समाजाला दिलासा दिला नाही तर समाज त्यांना तसेही रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही”, असंही चंद्रकांत पाटलांनी यावेळी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
कोरोना काळात मयताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही औलादी आहेत; अजित पवार भडकले
चंद्रकांत पाटलांसह भाजपावाले कोमात आहेत काय?; हसन मुश्रीफ यांचा सवाल
संभाजीराजे राजीनामा देऊ नका, भाजपात राहूनच आरक्षण मिळेल- नारायण राणे
“छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून निर्णय घेताना संभाजीराजेंनी समाजाचा विचार करावा, स्वार्थ पाहू नये”