Home महाराष्ट्र चंद्रकांत पाटलांसह भाजपावाले कोमात आहेत काय?; हसन मुश्रीफ यांचा सवाल

चंद्रकांत पाटलांसह भाजपावाले कोमात आहेत काय?; हसन मुश्रीफ यांचा सवाल

कोल्हापूर : महाराष्ट्र झोपेत असतानाच राज्य सरकार रात्रीत कोसळेल, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यावरुन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलाय. ते कोल्हापूरात पत्रकारांशी बोलत होते.

महाराष्ट्र झोपेत असतानाच राज्य सरकार रात्रीत कोसळेल, असं म्हणणारे चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावाले कोमात आहेत की काय?” असा सवाल हसन मुश्रीफ यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरून सरकारबद्दल नाराजी व आंदोलन केल्याकडे लक्ष वेधल आहे. पण ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला त्यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे. 102  व्या घटना दुरुस्तीनुसार आरक्षणाबाबत राज्यांना अधिकार नाहीत. तसेच 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही व गायकवाड समितीचा अहवालही विश्वासार्ह नाही, असंही हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

संभाजीराजे राजीनामा देऊ नका, भाजपात राहूनच आरक्षण मिळेल- नारायण राणे

“छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून निर्णय घेताना संभाजीराजेंनी समाजाचा विचार करावा, स्वार्थ पाहू नये”

…अन्यथा 7 जूनपासून रायगडावरून आंदोलन करणार अन् मी स्वत: आंदोलनात उतरणार- छत्रपती संभाजीराजे

“चंद्रकांत पाटीलजी, ही भाजपा ची मराठा समाजाशी गद्दारी नाही का?”