Home महाराष्ट्र “राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षण टिकलं नाही”

“राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षण टिकलं नाही”

मुंबई : मराठा आरक्षण संघर्ष समिती व मराठा आरक्षण समन्वय समिती यांच्यावतीने मराठा आरक्षणाच्या विषयावर राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचे नवी मुंबई माथाडी भवन येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

“माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत मराठा आरक्षणासंदर्भात केवळ कायदा केला नाही, तर तो उच्च न्यायालयात टिकवून सुद्धा दाखवला. पण महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे हे आरक्षण टिकवता आलं नाही आणि मराठा समाजाला आपल्या हक्काच्या आरक्षणापासून वंचित रहावे लागले, असं विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर  यांनी म्हटलंय.

फडणवीस सरकारने मागासवर्ग आयोग गठीत केले, लाखो पुरावे गोळा केले, मराठा समाज शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे, हे सिद्ध केले. 50 टक्के आरक्षण मर्यादेच्यावर जाण्याची अपवादात्मक परिस्थिती कशी आहे, याचीही कारणमीमांसा केली. त्यासाठी कायदा केला, पण त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले गेल्यानंतर कायद्याच्या बाजूने ठाम भूमिका न्यायालयाला पटवून दिली. त्यामुळे उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा कायदा टिकविण्यात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला यश आले. एव्हढेच नाही तर मराठा आरक्षण कायद्याची राज्यात अंमलबजावणीही सुरू केली, असंही प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

राज्यातील सरकारचा कारभार आणीबाणीची आठवण करुन देणारा- केशव उपाध्ये

“देशमुखांवरील कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार; संजय राऊत राष्ट्रवादीची सुपारी वाजवतायेत”

OBC राजकीय आरक्षणावरून भाजपा आक्रमक; उद्या राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन

संपूर्ण राज्य आता तिसऱ्या स्तरात, तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध सर्व जिल्ह्यात लागू; नवी नियमावली जारी