Home महाराष्ट्र “देवेंद्र फडणवीस माझे गाॅडफादर, राजीनामा दिला तरी भाजपमध्येच राहणार”

“देवेंद्र फडणवीस माझे गाॅडफादर, राजीनामा दिला तरी भाजपमध्येच राहणार”

बेंगलोर : काही महिन्यांपूर्वी कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजप नेते रमेश जारकीहोली यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे भाजपची बदनामी झाली होती. त्यानंतर आता ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

रमेश जारकीहोली यांनी नुकतीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कर्नाटकातील राजकीय स्थितीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यानंतर बोलताना त्यांनी फडणवीसांचं काैतुक केलं.

देवेंद्र फडणवीस माझे गाॅडफादर आहेत. आणि जरी मी राजीनामा दिला, तरी मी भाजपमध्येच राहणार, असंही जारकीहोली यांनी यावेळी म्हटलं. तसेच मला पुन्हा मंत्री होण्यात कोणताही रस नाही. देवेंद्र फडणवीस माझे गॉडफादर आहेत. म्हणूनच मी त्यांची भेट घेतली., असं जारकीहोली यांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, काँग्रेसमध्ये मी 20 वर्षे असताना मला कधीही सन्मान मिळाला नाही. तसेच काँग्रेस बुडतं जहाज आहे. मी काँग्रेसमध्ये परत जाण्याचा विचारही करत नाही, असंही जारकीहोली यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षण टिकलं नाही”

राज्यातील सरकारचा कारभार आणीबाणीची आठवण करुन देणारा- केशव उपाध्ये

“देशमुखांवरील कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार; संजय राऊत राष्ट्रवादीची सुपारी वाजवतायेत”

OBC राजकीय आरक्षणावरून भाजपा आक्रमक; उद्या राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन