कोल्हापूर : मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा आज कोल्हापुरात निघत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात हा मराठा मूक मोर्चा निघणार आहे.
या मराठा मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, शिवसेना खासदार संजय मंडलिक यांसारख्या सर्व आमदार-खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, सकाळी 8 वाजल्यापासून हजारो मराठा आंदोलक छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी जमा झाले. त्यानंतर 10 वाजता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शाहू समाधीचं दर्शन घेऊन आंदोलनात भाग घेतला. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनीही शाहू महाराजांच्या समाधीस्थळी येऊन दर्शन घेतलं. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजे छत्रपतींची भेट घेतली आणि आंदोलनाला भाजपचा पाठिंबा असल्याचं निवेदन दिलं. तसेच यावेळी सर्वच आंदोलक काळ्या पोशाखात आले होते. स्वत: संभाजीराजेही काळ्या पोशाखात आले होते. सर्व आंदोलकांनी काळे कपडे घालतानाच तोंडावर काळा मास्क लावला होता
महत्वाच्या घडामोडी –
अजित पवारांनी अधिकाऱ्यांच्या करिअरवर नांगर फिरवण्याचं काम केलंय- गोपीचंद पडळकर
“ठाकरे सरकारमधील तीन पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायले हवेत, कारण 2024 नंतर भाजपची सत्ता असणार”
मराठा आरक्षणाला वंचितचा पाठिंबा! मराठा मोर्चात आता प्रकाश आंबेडकर स्वत: उतरणार”
“टाक खंडणी बोलून पैसे जमा करणाऱ्या शिवसेनेनं राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावं