आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबईः ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी आजपासून मुंबईत आल्या आहेत. मुंबईत पोहोचताच त्यांनी सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी उद्धव ठाकरे लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करण्यासाठी आले. मला इथे येऊन बरे वाटले. दर्शनासाठी मला चांगली सुविधा दिली. मी खूप आनंदी आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
बंगालमध्येही गणपतीची उत्साहात पूजा केली जाते. मी मंदिर समितीचे, ट्रस्टीचे, पंडित, गुरुजी आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो, असं म्हणत ‘जय मराठा, जय बांग्ला’ असा नाराही ममता बॅनर्जींनी यांनी यावेळी दिला.
हे ही वाचा : भाजपा-शिवसेना यांच्यात पुन्हा मैत्री होणार का?; देवेंद्र फडणवीस म्हणतात…
ममता यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर, शहीद तुकाराम ओंबळे स्मारकाला भेट दिली आहे. यानंतर तुकाराम ओंबळे यांनी जे देशासाठी काम केलं त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी मी इथे आले आहे, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं
दरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा महत्वाचा मानला जात आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मनसेत जोरदार इनकमिंग; बीडमध्ये अनेक युवकांच्या हाती मनसेचा झेंडा
सांगली जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचं वर्चस्व; उपाध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला?
भाजप-मनसे युतीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…