मुंबई : महाराष्ट्राला आणि पर्यावरणाला वाचवायला माळकरी आणि वारकरीच पुरेसे आहेत, असं वक्तव्य अभिनेते सयाजी शिंदे यांनी केलं आहे.
आषाढी वारीनिमित्त सयाजी शिंदेंनी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहूमध्ये येऊन दर्शन घेतलं, यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, तुकोबारायांनी आपल्याला वृक्षवल्ली आम्हा सोयरे असा संदेश दिलाय तर ज्ञानोबा माउलींनी वृक्ष लावा आणि जलाशय वाढवा, असं सांगितलेलं आहे. मी सगळ्यांना आवाहन करतो की झाडांसमोर नतमस्तक व्हा. त्यांना मिठी मारा त्यातच तुम्हाला विठ्ठ्लाचं दर्शन होईल, असं सयाजी शिंदे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
हे सरकार जातीयवादी तर आहेच मात्र…; प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारवर टीका
शिवसेनेचा त्याग खूप मोठा आहे; सुधीर मुनगंटीवारांचा शिवसेनेला टोला
जे काही झालं त्यासाठी करण जोहरवर आरोप करणं म्हणजे…;राम गोपाल वर्माचा करण जोहरला पाठिंबा
“कोरोनाविरुद्धच्या लढाईत जीवाची बाजी लावणाऱ्या पोलिसांसाठी अनिल देशमुखांनी ‘ही’ मोठी घोषणा”