सिंधुदुर्ग : पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे, असं म्हणत भाजपचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. ते विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी करण्यासाठी आले असताना माध्यमांशी बोलत होते.
“दोन दिवसांपूर्वी नाणारमधील काही लोकांनी नाणार प्रकल्पाला समर्थन दिलं. त्यात 80 टक्के शिवसैनिक होते. पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे. बोलण्यात काय बदल करतील हे सांगू शकत नाही. पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करत आहेत. हे शिवसेनेचे घुमजाव आहेत. ही स्थानिक जनतेची फसवणूक आहे, असं नारायण राणे म्हणाले.
दरम्यान, विजयदुर्ग किल्ल्याची पडझड झाली असून आपण आता पाहणी केली आहे. संबंधित मंत्र्यांशी बोलून या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार आहे. अधिवेशनात ही मागणी करणार असल्याचे यावेळी राणे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
बाईसाहेब, जरा सबुरीने घ्या; अमृता फडणवीसांना माजी पोलिस अधिकाऱ्याचे पत्र
पावसाचा जोर ओसरल्याने सांगलीत पुराचा धोका टळला; कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट
ह्या सरकारचं डोकं सरकलय की काय?; निलेश राणेंची राज्य सरकारवर टीका
…मग सुशांत सिंग प्रकरणात तुम्हीच पुरावे दाबत आहात असं म्हणायचं का?; रोहित पवारांचा भाजपला सवाल