संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा; चंद्रकांत पाटलांचा टोला

0
163

कोल्हापूर : सचिन वाझे यांना मनसुख हिरेन प्रकरणात अटक करण्यात आली असून त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्धवजींनी आता अतिशय धाडसी, कोणाचीही काळजी न करता स्टेटमेंट करणाऱ्या, कोण आहे या समोर अस म्हणणाऱ्या संजय राऊतांना महाराष्ट्राचे गृहमंत्री केलं पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, त्यासोबतच संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा, त्यांच्याशिवाय मंत्रिमंडळामधील कुणीच मंत्री बोलत नाहीत, असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

…त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- नारायण राणे

करूणा शर्मा आता राजकारणाच्या मैदानात; केली ‘ही’ मोठी घोषणा

“हे ठाकरे सरकारचे पाप; मुंबई पोलीसांची इतकी बदनामी कधीच झाली नव्हती”

मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी माझ्यावर दबाव होता; सचिन वाझेंसाठी उद्धव ठाकरेंनी फोन केला होता- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here