आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : विधानसभेचं हिवाळी अधिवेशनात काम कमी आणि आरोप-प्रत्यारोप जास्त झाले. अशातच विधान परिषदेतून 2 मोठे नेते निवृत्त झाले. एक म्हणजे काँग्रेसचे भाई जगताप आणि शिवसेनेचे रामदास कदम.
रामदास कदम यांनी निरोपाचं भाषण केलं. अवघ्या सात मिनिटात त्यांचं भाषण संपलं मात्र त्यांचं हे 7 मिनिटाचं भाषण मात्र चर्चेत राहिलं. रामदास कदम यांचं गेल्या काही काळापासून शिवसेनेसोबतच सुरु असलेलं भांडण. त्याचाही उल्लेख त्यांनी भाषणात केला.
हे ही वाचा : मनसेचं खळखट्याक; नांदेड महानगरपालिकेवर केलं टाळे ठोको आंदोलन
रामदास कदमांनी भाषणात नक्की काय म्हटलं?
माझ्यानंतर उद्धवला साथ द्या, बाळासाहेबांच्या ह्या वक्तव्यावर रामदास कदमांनी भर दिला. बाळासाहेबांच्या आत्म्याला वेदना होतील अशी एकही गोष्ट माझ्या हातून घडणार नाही. ते म्हणाले- पक्षामुळे व्यक्ती मोठी होते, व्यक्तीमुळे पक्ष नाही, मराठा माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडणारी शिवसेना ह्या घोषवाक्यासह माननीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला जन्म दिला. त्या घोषवाक्याकडे आकर्षीत होऊन मी 1970 साली शिवसेनेत काम करायला सुरुवात केली. त्याला आता 52 वर्षे होतायत. एक शिवसैनिक, गटप्रमुख, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख, आमदार, नामदार, मी स्वत:ला भाग्यवान समजतो सभापती महोदय, अनेक वर्षे 40-45 वर्ष मला शिवसेनाप्रमुखांच्या सानिध्यात काम करण्याची संधी मिळाली., असं रामदास कदम म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“सांगलीत नऊ वर्षाच्या चिमुरडीने केला ब्रायडल मेकअप”
“विधानसभेला अध्यक्ष मिळू नये ही भाजपची भूमिका”
मनसेत जोरदार इनकमिंग; अनेक युवक आणि महिलांचा मनसेत प्रवेश