मराठा आंदोलनाला हिंसक वळण; माजलगाव नगरपरिषद फोडली

0
112

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण प्रचंड तापलं आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याला जाळपोळ केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता माजलगाव नगरपरिषदेवर दगडफेक करण्यात आली. तर संतप्त जमावाने नगरपरिषदेला आग लावली. त्यामुळे नगरपरिषदेचं मोठा नुकसान झालंय.

ही बातमी पण वाचा : राज्यातील घडामोडींना वेग; मुख्यमंत्री राज्यपलांच्या भेटीला राजभवनावर, तर फडणवीसांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक

माजलगावमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. पण या आंदोलनामुळे माजलगाव नगरपरिषदेच्या ऑफिसमध्ये फर्निचर, खुर्ची, टेबल, कॉम्प्युटर जळून खाक झालंय. तसेच मुख्याधिकाऱ्यांचं संपूर्ण ऑफिस जळून खाक झालंय.

दरम्यान, आंदोलकांनी माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाला आग लावली. त्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्याला देखील जाळपोळ केल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मोठी बातमी! शिंदे गटाच्या खासदारानंतर आता अजित पवार गटातील ‘हा’ आमदार देणार राजीनामा?

जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा – देवेंद्र फडणवीस

शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत मुख्यमंत्र्यांची मराठा आरक्षणाबद्दल मोठी घोषणा, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here