माही इज बॅक! धोनीने सुरू केली आयपीएलची तयारी; पाहा फोटो

0
173

इंडियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम अवघ्या एका महिन्यावर आला आहे. 9 एप्रिलपासून या हंगामाची सुरुवात होणार आहे. मात्र महिनाभर आधीच चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनी याने सरावाला सुरुवात केली आहे. त्याचे सराव करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बीसीसीआयने आयपीएल 2021 चे वेळापत्रक जाहीर करण्यापुर्वीच धोनी चेन्नईला पोहोचला होता. यानंतर नियमानुसार क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यावर आणि कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर त्याला सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारपासून धोनी मैदानात उतरला आहे.

धोनीसह त्याचे शिलेदारही सरावात व्यस्त झाले आहेत. यात अंबाती रायुडू, ऋतुराज गायकवाड तसचं चेन्नईने आयपीएल 2021 लिलावात विकत घेतलेले एन जगदीशन, साई किशोर आणि सी हरि निशांत हेदेखील धोनीसोबत सराव करताना दिसले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

रोहित पवारांच्या ‘त्या’ ट्विटला अमृता फडणवीसांचा रिप्लाय; म्हणाल्या….

“खासदार नुसरत जहाॅं यांचा टॅटू सोशल मीडियावर व्हायरल”

“‘हा’ प्रसिद्ध मराठी अभिनेता पुन्हा एकदा विवाहबंधनात”

“विरोधकांनी मनसुख हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचं करू नये”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here