Home महाराष्ट्र उस्मानाबादमध्ये महाविकास आघाडी फुट; जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष काँग्रसचे, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे, तर...

उस्मानाबादमध्ये महाविकास आघाडी फुट; जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष काँग्रसचे, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे, तर शिवसेनेला ठेंगा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

उस्मानाबाद : ग्रामीण भागात शिवसेनेचे प्रभुत्व आहे. मात्र भाजपला शह देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेने महाविकास आघाडीची मोट बांधली. निवडणुकीत शिवसेना , राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे 5-5 संचालक निवडून आले. मात्रआज जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणूक महाविकास आघाडीत अखेर फुट पडली.

हे ही वाचा :  पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला दिला मोठा धक्का; ‘या’ माजी नगरसेविकांचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आले ती महाविकास आघाडीसाठी पुढाकार घेणरी  शिवसेना मात्र एकटी पडली. शिवसेनेचे 5 संचालक निवडून आले होते. त्यापैकी एक संचालक भूम परांड्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी घरोबा केला.

एकंदरीत या निवडणुकीत शिवसेनेला भोपळा मिळाला. 11 विरुद्ध 4 मतांनी काँग्रेस व राष्ट्रवादी विजयी झाले.

महत्वाच्या घडामोडी –

“निवडणूक व्हायच्या आधी काहींनी सांगितलं, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, पण आम्ही त्यांना येऊ दिलं नाही”

“चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा भाजपला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

पंतप्रधानांच्या समोरच अजित पवारांचा राज्यपालांना टोला, म्हणाले…