मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली असून पक्ष मजबुतीसाठी ठिकठिकाणी बडे नेते कामाला लागले आहेत . मुंबईसह पुणे, नाशिक, औरंगाबाद या महापालिकेसाठी सर्वच राजकीय पक्षांची चुरस सुरु आहे. यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
भाजपाला सत्ता स्थापनेपासून रोखण्यासाठी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीत सहभागी पक्ष एकत्रित लढणार आहे, असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.
दरमयान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी स्वबळाचा नारा दिला होता. अशातच आता थोरात यांच्या वक्तव्याने पुन्हा राजकीय चर्चेला उधाण आलंय.
महत्वाच्या घडामोडी –
“नागपूरमध्ये शिवसेनेला धक्का! शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश”
महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुध्दीने- नवाब मलिक
“भर लग्नात नवरदेवीने लगावले ठुमके, वऱ्हाडी आणि पाहुणे पहातच राहिले; व्डिडिओ होतोय व्हायरल”
“ईडीच्या नोटिसा पाठवून आघाडीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, आम्ही दबावाला बळी पडणार नाही”