महाविकास आघाडी म्हणजे ‘वाह री सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल’; सुधीर मुनगंटीवारांची टीका

0
339

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्य सरकारने दारु स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन महाविकास आघाडी सरकार म्हणजे तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, अशी टीका  भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारची खिल्ली उडवली आहे.

हे ही वाचा : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन; वयाच्या 58 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महाविकास आघाडी सरकार म्हणजे तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, अशी या सरकारची नीती आहे. जनतेच्या आशीर्वादाने लोकशाही मार्गाने सरकार निवडून येतात. त्या सरकारचा प्रत्येक निर्णय शेतकऱ्यांना समर्पित असतो. शोषित समाजाला समर्पित असतो. वंचित समाजाला समर्पित असतो. गोरगरिबांना समर्पित असतो. शेतमजुरांना समर्पित असतो. पण बेइमानीच्या आधारावर हे सरकार स्थापन झालेले आहे. जनतेने निवडून दिलेलं हे सरकार नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

दारू स्वस्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यांचा हा निर्णय हर्बल वनस्पतीवाल्यांसाठी आणि क्रुझ पार्टीवाल्यांसाठी समर्पित आहे. सरकार पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करत नाही. दारूचे पण भाव कमी करून बेवड्यांना ऊर्जा देण्याचं काम हे सरकार करत आहे, अशी टीकाही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

काँग्रेसचं दलितांवरील प्रेम हा दिखाऊपणा, भंकपपणा; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

जे रिॲक्ट होत नाहीत त्यांना योग्य वेळी संधी मिळते’; पंकजाच्या त्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांंचं सूचक विधान

शिवसेनेमुळेच औरंगाबादचा विकास झाला; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here