“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाटेल तोपर्यंतच महाविकास आघाडी सरकार टिकेल”

0
505

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटेल तोपर्यंतच महाविकास आघाडी सरकार टिकेल, असा गौप्यस्फोट शिवसेना आमदार संजय राठोड यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना वाटेल तोपर्यंतच सरकार टिकेल. जोपर्यंत सरकार चालवायचं आहे तोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चालवतील. त्यानंतर पुढचा निर्णय ते घेतील. तसेच सरकार टिकवायचं आहे की नाही ते पुर्णपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाती आहे, असं संजय राठोड म्हणाले. ते उस्मानाबादमध्ये बंजारा समाजाचा मेळाव्यात बोलत होते.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं काम अत्यंत चांगलं असून त्यांचं देशभरातून उत्कृष्ठ कामाबद्दल कौतूक झालेलं आहे. तसेच राज्यातील लोकांना शिवसेनेचं काम आवडलं आहे., असं काैतुकही संजय राठोड यांनी यावेळी केलं.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ जिल्हा कार्याध्यक्षांचा राजीनामा

अजित दादांनी मुख्यमंत्र्यांचं ऐकावं, नाहीतर…; संजय राऊतांचा इशारा

“मोदींना टक्कर देऊ शकेल असा कोण नेता असेल, तर त्या ममता बॅनर्जी आहेत”

संजय राऊत, पवार कुटूंबाची चाटूगिरी किती करणार, जिभेला आराम द्या; निलेश राणेंचा घणाघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here