Home महाराष्ट्र “नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकार घालवायचं आहे”; नव्या वर्षी रामदास आठवलेंचा संकल्प

“नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकार घालवायचं आहे”; नव्या वर्षी रामदास आठवलेंचा संकल्प

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शनिवारी कोरेगाव भीमा येथे 204 वा शौर्य दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे मंत्री हजेरी लावली. यावेळी रामदास आठवलेंनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.

रामदास आठवले यांना पत्रकारांनी नविन वर्षाचा संकल्प काय आहे असं विचारले असता त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देत “नविन वर्षाचा संकल्प हा महाविकास आघाडी सरकार घालवायचा आहे. रिपब्लिकन पक्ष अत्यंत मजबूत करायचा आणि समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करायचा असा संकल्प असणार आहे,” असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

हे ही वाचा : “मुख्यमंत्र्यांनी दिली मुंबईकरांना नवीन वर्षाची भेट; महापालिका हद्दीतील 500 चाै. फुटापर्यंतच्या मालमत्ता कर केला रद्द”

“शौर्यदिन आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आहे. 1818 साली या ठिकाणी 500 जणांनी बलिदान दिले होते. या निमित्ताने सर्व आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी एकजुटीने पुढे जाण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी पुढाकार घेण्याची माझी तयारी आहे,” असंही रामदास आठवले म्हणालेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, 1818 साली कोरेगाव भीमा इथे पेशव्यांच्या सैन्याविरुद्ध झालेल्या लढाईत गाजवलेल्या शौर्याबद्दल हा स्तंभ उभारण्यात आला होता. त्यानंतर अनेकांकडून या ठिकाणी मानवंदना देण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे, नितीन राऊत, संजय बनसोडे,  यांनीही उपस्थिती लावली.

महत्वाच्या घडामोडी – 

मागील 7 वर्षात पंतप्रधान मोदींनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा केली; राष्ट्रवादीचा सवाल

गल्लीत क्रिकेट जिंकणारे म्हणत आहेत की, आम्ही वर्ल्डकप जिंकू; मलिकांचा राणेंना टोला

नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करायचंय- रामदास आठवले