मुंबई : धनगर आरक्षणाबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पारंपारिक वेशभूषेत हटके पद्धतीने ढोल बजाओ आंदोलन केलं. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
झोपेचं सोंग घेणाऱ्या सरकारला जागं करण्यासाठी धनगरी पेहराव परिधान करुन, ढोल वाजवून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचं पडळकर यांनी म्हटलं. तसेच हा पेहराव आणि ढोल म्हणजे आमचा स्वाभिमान, अभिमान आणि अस्तित्व आहे. पण या अस्तिस्वाशी खेळ करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत असल्याची टीका पडळकरांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर एकही बैठक घेतली गेली नाही. महाविकास आघाडी सरकारमधीलच काही नेते पिवळा फेटा, खांद्यावर घोंगडी, हातात काठी घेऊन धनगर आरक्षणावर प्रश्न विचारत होते. मग आता तेच नेते गप्प का? असा सवालही यावेळी पडळकरांनी उपस्थित केला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी जे आदिवासींना तेच धनगरांना दिलं होतं. धनगरांसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली होती. पण त्यातील एक रुपयाही महाविकास आघाडी सरकारनं दिला नाही., असंही पडळकर म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हा भाजपचा एककलमी कार्यक्रम- अशोक चव्हाण
“भारताचे पहिले हिंदकेसरी काळाच्या पडद्याआड, कोल्हापूरचे कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांचं निधन”
कोरोना, कोरोनाचा बाप, कोरोनाचा आजोबाही सभागृहात घुसू शकणार नाही- सुधीर मुनगंटीवार
ठाकरे सरकारचा सत्यानाश झाला पाहिजे- निलेश राणे