Home महाराष्ट्र महाराष्ट्राचे उद्धव ठाकरेच बेस्ट CM! कोरोनाची दुसरी लाट यशस्वी हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून...

महाराष्ट्राचे उद्धव ठाकरेच बेस्ट CM! कोरोनाची दुसरी लाट यशस्वी हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून मिळाली पसंती

मुंबई : राज्यात कोरोनाच्या संकाटावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच एका ज्येष्ठ पत्रकाराने काही दिवसांपूर्वी देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सर्वोत्तम कामगिरी करणारे मुख्यमंत्री कोण होते हे जाणून घेण्यासाठी ट्विटरवर जनमत चाचणी घेतली होती. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक म्हणजेच 62 टक्क्यांहून मतं मिळाली आहेत.

ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर, कोणत्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कालावधीमध्ये सर्वोत्तम नियोजन केलं?, असा प्रश्न विचारत 2 पोल घेतले होते. एका पोलला चारच पर्याय देता येत असल्याने त्यांनी दोन पोल घेत आठ मुख्यमंत्र्यांचे पर्याय दिले होते.

पहिल्या पोलमध्ये 62.5 टक्के मत ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मिळाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 31.6 टक्के, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 4.6 टक्के तर केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना 1.3 टक्के मत मिळाली.

दुसऱ्या पोलमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना सर्वाधिक म्हणजेच 49 टक्के मत मिळाली. तसेच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना 48.5 टक्के मत मिळाली. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी 1.7 टक्के मतं मिळाली, तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना केवळ 0.5 टक्के मतं मिळाली.

महत्वाच्या घडामोडी –

नुकसानग्रस्तांना राज्य सरकार मदत करेलच, पण फडणवीसांनीही केंद्राला पत्र लिहावं- रोहित पवार

“महाराष्ट्रातलं सध्याचं सरकार आपण घालवू या फाजील विश्वासावर विरोधी पक्ष जगतोय”

कोकणात वादळ चार तास थांबलं पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन तासही थांबले नाहीत- प्रवीण दरेकर

“ज्या शिवसेनेला कोकणाने भरभरून बळ दिलं त्या शिवसेनेनं कोकणाला वाऱ्यावर सोडून दिलं”