मुंबई : भाजपने 26 जून रोजी ओबीसी आरक्षण पूर्ववत करावं यासाठी चक्का जाम आंदोलन केलं होतं. नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडलं. यावेळी बोलताना त्यांनी, “आमच्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, नाहीतर मी राजकारणातून संन्यास घेईन,” असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीस यांची नौटंकी महाराष्ट्राला समजली आहे. आता राज्यातील जनताच देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून संन्यास देईन, असं म्हणत नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते आज टिळक भवनात माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणारा भारतीय जनता पक्ष, केंद्रातील मोदी सरकार व तत्कालीन फडणवीस सरकारच जबाबदार आहे. तसेच केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात ओबीसींची आकडेवारी दिली असती तर ही वेळच आली नसती. पण भाजपाने ते जाणीवपूर्वक होऊ दिले नाही. आता मात्र भाजप नेते ओबीसींचा कळवळा असल्याचे दाखवत आहेत, असा टोला नाना पटोलेंनी भाजपला लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
पवार कुटुंबाला सगळं फुकट पाहिजे; बालेवाडीतील कार पार्किंगवरून निलेश राणेंचा हल्लाबोल
लेकीनंही बापाने केलेल्या कामाची जाण ठेवली पाहिजे; गुलाबराव पाटलांचं रक्षा खडसेंना प्रत्युत्तर
भाजपचे नेतेच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी, भाजपचं हे ढोंगी राजकारण- अमोल मिटकरी
देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राला गरज, त्यांचं भविष्य उज्वल, मी स्वत: भेटेन- संजय राऊत