…महाराष्ट्राला मुन्नाभाईच्या नावाने मामू मिळाले; शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

0
411

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच पुण्यात सभा घेणार असल्याचं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर देखील आले होते. मात्र, अचानक ऐनवेळी त्यांची सभा पुढे ढकलण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. यावरून आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दिपाली सय्यद यांनी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दिलेल्या मुन्नाभाई या उपमेचा उल्लेख करत निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : “काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ मोठ्या नेत्यानं सोडली काँग्रेसची साथ, आता भाजपमध्ये करणार प्रवेश?”

पावसाचं कारण सांगून मैदान सोडले..भोंग्याचे कारण सांगून देशपांडे पळाले..आयोध्येचे कंत्राट अर्धेच मिळाले.. महाराष्ट्राला मुन्नाभाईच्या नावाने मामू मिळाले”, असा टोला दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना या व्हिडोओत लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“उद्धव ठाकरेंकडून संभाजीराजेंना शिवसेना प्रवेशाची ऑफर; लवकरच शिवबंधन हाती बांधणार?”

यापुढे महिलेवर हात उगाराल तर…; पुणे मारहाण प्रकरणी सुप्रिया सुळेंचा भाजपला इशारा

“रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते, रामदास आठवलेंचे जुने सहकारी एम.डी.शेवाळे यांचं निधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here