मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरांना घरी जाण्यासाठी केंद्र सरकारनं पैसे दिल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेत केला होता. यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
केंद्र सरकारच्या वतीनं सर्वोच्च सरकारी वकील तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की, परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यामध्ये नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या रेल्वेचे सगळे पैसे हे महाराष्ट्र सरकारनं दिले. त्यामध्ये केंद्र सरकारनं कुठलाही पैसा खर्च केला नाही. असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
दरम्यान, भाजपा आतापर्यंत महाराष्ट्रातील लोकांना मुर्ख बनवत आली आहे. हे सर्वोच्च न्यायालयाच्या सरकारी वकिलांच्या विधानावरून स्पष्ट होतं. हा महाराष्ट्र द्रोह आहे आणि गद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च सरकारी वकील तुषार मेहता यांनी मा. सर्वोच्च न्यायालयाला सांगितले कि परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यामध्ये नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या रेल्वेचे सगळे पैसे हे महाराष्ट्र सरकारने दिले. त्यामध्ये केंद्र सरकारने कुठलाही पैसा खर्च केला नाही. pic.twitter.com/7yVUXKeC5S
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 29, 2020
महत्वाच्या घडामोडी –
लहान राज्यंही तुमच्याप्रमाणे जीएसटीसाठी रडत बसलेली नाहीत- देवेंद्र फडणवीस
मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत – डोनाल्ड ट्रम्प
धक्कादायक! “कोरोना विषाणू घालवण्यासाठी पुजाऱ्यानं दिला नरबळी”
निवृत्तीनंतर शिखर धवन दिसू शकतो ‘या’ भूमिकेत