आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या.
शेतकरी, महिलांसाठी या अर्थसंकल्पातून मोठ्या घोषणा करण्यात आल्या. देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण अर्थसंकल्प हा आयपॅडमधून वाचला.
या अर्थसंकल्पातील 10 महत्त्वाच्या घोषणा :
1 ) शेतकऱ्यांना मिळणार 12 हजारांचा निधी : –
प्रधानमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत राज्य सरकार प्रतीवर्ष प्रत्येक शेतकऱ्याला 6 हजार रुपये देणार आहे. केंद्राचे 6 हजार आणि राज्याचे 6 हजार असे मिळून शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी 12 हजार रुपये मिळणार आहेत.
2) एक रुपयात पीक विमा : –
राज्यातील शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयामध्ये पीक विमा मिळणार आहे. शेतकऱ्यांवर याचा कोणताच भार पडणार नाही. राज्य सरकार हा हफ्ता भरणार आहे. शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया भरायचा आहे, या योजनमुळे राज्य सरकारला 3,312 कोटींचा भार पडणार आहे.
3) शेतकरी कर्जमाफी : –
2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. 12.84 लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4,683 कोटी रुपये थेट जमा केले. अपघातग्रस्त शेतकऱ्यांना 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे.
हे ही वाचा : “शिंदेंनंतर आता मनसेकडून ठाकरे गटाला मोठं खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतला मनसेचा भगवा झेंडा”
4) महिलांना एसटीमध्ये 50 टक्के सूट : –
* महिलांना एसटी मध्ये 50 टक्के सूट मिळणार आहे.
* पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ होणार आहे.
* जन्मानंतर मुलीला 5000 रुपये मिळणार
* पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये मिळणार
* अकरावीत 8000 रुपये मिळणार
* मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये मिळणार
5) अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ : –
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली आहे.
* आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
* गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये
* अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
* मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
* अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये
* अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
* अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली
6) महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार
* महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण 1.50 लाखांहून 5 लाख रुपये
* त्यामुळे आता 5 लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार
* नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेश करणार
* मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ 2.50 लाखांहून 4 लाखांपर्यंत
* राज्यभरात 700 स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना
7) निराधार योजनांमध्ये वाढीव अर्थसहाय्य : –
* अंत्योदयाचा विचार
* संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये
* राज्य सरकार अतिरिक्त 2400 कोटी रुपयांचा भार उचलणार
* प्रत्येक महिन्यात पहिल्याच आठवड्यात नियमित प्रदान
8) गुढी पाडव्याला आनंदाचा शिधा : –
गुढीपाडव्याला 1 कोटी 63 लाख शिधाधारकांना आनंदाचा शिधा दिला जाणार आहे.
9) 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम : –
इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना’
* प्रधानमंत्री आवास योजना : 4 लाख घरे
(2.5 लाख घरे अनुसूचित जाती-जमाती, 1.5 लाख इतर प्रवर्ग)
* रमाई आवास : 1.5 लाख घरे/1800 कोटी रुपये
(किमान 25 हजार घरे मातंग समाजासाठी)
* शबरी, पारधी, आदिम आवास : 1 लाख घरे/1200 कोटी रुपये
* यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत: 50,000 घरे/600 कोटी
(25,000 घरे विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी धनगर : 25,000 घरे)
* इतर मागासवर्गियांसाठी नवीन घरकुल योजना : मोदी आवास घरकुल योजना : 3 वर्षांत 10 लाख घरे /12,000 कोटी रुपये
10) शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी 10 हजार रुपयांची वाढ : –
* प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये
* माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये
* उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये
* पीएमश्री शाळा : 816 शाळा/ 5 वर्षांत 1534 कोटी रुपये
महत्त्वाच्या घडामोडी –
” ‘या’ ठिकाणी राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा, शरद पवार म्हणाले, आमचा पाठिंबा भाजपला नाही, तर…”
भावी पंतप्रधानांना शुभेच्छा, भंकस वाटली असेल तर…; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला
मनसे नेते वसंत मोरेंच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी, वसंत मोरेंकडून संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…