“मध्यप्रदेश हादरलं! भाजपच्या पदाधिकाऱ्यासह चाैघांनी 20 वर्षाच्या तरूणीवर केला बलात्कार”

0
206

नवी दिल्ली : मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील एका 20 वर्षीय तरूणीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यासह अन्य 4 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणीचं अपहरण करून आरोपींनी तिला जैतपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या गाडाघाट परिसरातील फार्म हाऊसमध्ये घेऊन गेले. त्यानंतर बळजबरीने तिला दारू पाजली. आणी 18 व 19 फेब्रुवारीला तिच्यावर सलगपणे बलात्कार केला. तसेत त्यानंतर पीडितेला 20 फेब्रुवारी रोजी तिच्या घरासमोर गंभीर अवस्थेत फेकून दिले. पीडितेनं रविवारी 4 व्यक्तींच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी विजय त्रिपाठी, मुन्ना सिंग, राजेश शुक्ला व मोनू महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या हे चारही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

दरम्यान, यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर, शहडोल जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष कमल प्रताप सिंग यांनी सांगितलं की, या प्रकरणात विजय त्रिपाठीचं नाव समोर आल्यानंतर त्याला जैतपूर मंडळाच्या अध्यक्ष पदावरून तातडीनं निलंबित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर त्याचं पक्षाचं सदस्यत्व देखील रद्द करण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

माझं महाराष्ट्रातील जनतेला कळकळीचं आवाहन की…; राजेश टोपे यांच रुग्णालयातून पत्र

गैरजबाबदार असा पुरस्कार शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना दिला पाहिजे- किरीट सोमय्या

…म्हणून महाराष्ट्रात परत लॉकडाऊन; निलेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका

“देऊळ बंद! वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेगावचे गजानन महाराज मंदीर पुन्हा बंद”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here