Home महाराष्ट्र “अर्थमंत्री मॅडम, एवढा मोठा निर्णय ही नजरचूक कशी असू शकते?”

“अर्थमंत्री मॅडम, एवढा मोठा निर्णय ही नजरचूक कशी असू शकते?”

मुंबई : केंद्र सरकारने विविध अल्पबचत योजनांवरील व्याजाच्या दरात कपात केली. त्यानंतर लगेचच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही कपात मागे घेतली. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

सामान्य जनतेला तुम्हाला दिलासा देता येत नसेल तर देऊ नका, पण त्यांच्यावर व्याजदर कपातीचा दांडपट्टा तरी चालवू नका. अर्थमंत्री मॅडम, एवढा मोठा निर्णय ही नजरचूक कशी असू शकते? तीदेखील प. बंगालसारख्या राज्यातील निवडणूक सत्ताधारी पक्षाने, प्रामुख्याने पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी प्रतिष्ठेची केलेली असताना? असा सवाल शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकार आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना केला आहे.

अर्थमंत्री मॅडम, तुम्ही ‘नजरचूक’ दुरुस्त केली हे ठीक, पण जो ‘बूंद से गयी…’ त्याचे काय? पुन्हा निवडणुका संपल्यावर अर्थमंत्र्यांची ‘नजरचूक’ जनतेच्या ‘खिशावर’ असे होणारच नाही याची खात्री काय? असा प्रश्न सामनातून करण्यात आला आहे.

दरम्यान, जी गोष्ट मुळातच करण्याची गरज नव्हती ती केल्याने केंद्र सरकारला हा यू टर्न घ्यावा लागला. पुन्हा त्यातून सरकारवर जो टीकेचा भडिमार व्हायचा, जो आरोप व्हायचा तो झालाच. प. बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुका आहेत म्हणून सरकारने हे घूमजाव केले अशी टीका आता होत आहे. त्यात काय चुकीचे आहे? असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांच मोठ वक्तव्य; म्हणाले…

“भाजपच्या ‘या’ नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश”

कोहली नंबर-1! आयसीसी एकदिवसीय रॅंकिंगमध्ये विराट कोहली अव्वल स्थानी

“अभिनेत्री आलिया भट्ट कोरोना पाॅझिटिव्ह”