Home क्रीडा कोहली नंबर-1! आयसीसी एकदिवसीय रॅंकिंगमध्ये विराट कोहली अव्वल स्थानी

कोहली नंबर-1! आयसीसी एकदिवसीय रॅंकिंगमध्ये विराट कोहली अव्वल स्थानी

मुंबई : नुकतंच आयसीसीने आंतराराष्ट्रीय सामन्यातील एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधील खेळाडूंची रँकिंग जाहीर केली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसीच्या एकदिवसीय सामन्यातील रँकिंगमध्ये नंबर 1 चा खेळाडू ठरला आहे. इंग्लंड विरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने चांगली कामगिरी केली होती, त्याचा फायदा त्याला रँकिंगमध्ये झाला आहे.

विराट कोहली 870 गुण मिळवून एकदिवसीय सामन्यातील रँकिंगमध्ये नंबर 1 चा खेळाडू बनला आहे. तर पाकिस्तानच्या बाबर आझम दुसऱ्या स्थानी आला आहे. तर भारताचा सलामी फलंदाज रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. तसेच या यादीत केएल राहुल 27 व्या क्रमांकावर असून, हार्दिक पांड्या 42 व्या स्थानावर आला. तर यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने देखील टाॅप 100 खेळाडूंच्या यादीत आपलं स्थान पटकावलं आहे.

गोलंदाजाच्या यादीत भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. आधी तो तिसऱ्या स्थानी होता. बुमराह इंग्लंड विरूद्धची मालिका खेळला नव्हता. इंग्लंड विरूद्ध उल्लेखनीय कामगिरी करणारा भुवनेश्वर कुमार 11 व्या स्थानी झेप घेतली आहे. तर शार्दुल ठाकूरने 12 अंकाची झेप घेऊन 80 व्या स्थानी मजल मारली आहे.

दरम्यान, कसोटी रँकिंगमध्ये न्युझीलंडच्या केन विल्यमसनने बाजी मारत पहिलं स्थान पटकावलं आहे. तर विराट कोहली 5 व्या स्थानी आहे. तर रोहित शर्मा 9 व्या स्थानी पोहचला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“अभिनेत्री आलिया भट्ट कोरोना पाॅझिटिव्ह”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छळ केल्यानेच सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा मृत्यू झाला”

“खासदार उदयनराजे भोसले यांना महाविकास आघाडीचा मोठा धक्का”

केंद्र सरकारने यापूर्वीचे निर्णय देखील असेच नजरचुकीने घेतले होते का?; जयंत पाटलांचा सवाल