पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचं शुक्रवारी मध्यरात्री उपचारादरम्यान निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज पंढरपुरातील सरकोली येथे अंत्यसंस्कार केले जातील. भारत भालके यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली.
पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार श्री. भारत भालके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!, असं ट्विट करत शरद पवारांनी भारत भालके यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार श्री. भारत भालके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/ifO4z8cRCl
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 28, 2020
महत्वाच्या घडामोडी-
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं उपचारादरम्यान निधन
राज्यात 31 डिसेंबरपर्यंत लाॅकडाऊन वाढवला; ठाकरे सरकारचा निर्णय
महाराष्ट्राला कर्तबगार मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नकोय; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
चंद्रकांत पाटलांचा जन्म राजकारणासाठी नव्हे तर हिमालयात जाण्यासाठी झाला आहे- हसन मुश्रीफ