आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
लोकसभा निवडणूकीसाठीचे पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशातील 102 जागांवर मतदान होत असून त्यात महाराष्ट्रातील पाच जागा आहेत.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात आज पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा – गोंदिया, गडचीरोली आणि चंद्रपूर मतदारसंघात मतदान होणार आहे. नक्षली भागातसह संवेदनशील मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंचा मनसेला आणि भाजपचा मोठा धक्का
गडचिरोली मतदारसंघात सकाळी सात ते दुपारी तीन मतदानाची वेळ असणार आहे. नागपुरात लोकसभा मतदारसंघात 61 संवेदनशील मतदान केंद्र आहेत तर नागपूर लोकसभा मतदारसंघात 2105 मतदारसंघ, आणि रामटेकमध्ये 2405 मतदान केंद्र आहेत.
सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदार रामटेक आणि नागपूर लोकसभा उमेदवारांचे भवितव्य मत पेटीमध्ये टाकणार आहे, त्यामुळे विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि पराजय कोणाचा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
दरम्यान, 21 राज्यांत 102 मतदार संघात 1 हजार 625 उमेदवार निवडणूक लढवणार आहे. सकाळी 7 वाजता सुरु झालेले मतदान संध्याकाळी 6 पर्यंत चालणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“…नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लोकसभा लढतील”
एकनाथ खडसे करणार भाजपमध्ये प्रवेश; मात्र ‘या’ भाजप नेत्याचा विरोध
मोठी बातमी! राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते नाराज; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’