Home महाराष्ट्र एकनाथ खडसे करणार भाजपमध्ये प्रवेश; मात्र ‘या’ भाजप नेत्याचा विरोध

एकनाथ खडसे करणार भाजपमध्ये प्रवेश; मात्र ‘या’ भाजप नेत्याचा विरोध

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपात प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांनी स्वत: याबाबत घोषणा केली आहे. मात्र खडसेंच्या भाजप प्रवेशावर जळगावातील भाजपचे बडे नेते गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एकनाथ खडसे यांना आता अचानक मोदींचे काम चांगले असल्याचा साक्षात्कार कसा झाला? भाजपमध्ये असताना 30 वर्ष तुम्ही लाल दिव्याच्या गाडीत फिरले, आणि एकदाच आपली कन्या हरल्यानंतर लगेच पक्ष तुमचा दुश्मन झाला, लगेच तुम्ही पार्टी बदलली?”, असा सवाल गिरीश महाजन यांनी यावेळी केला.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते नाराज; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

दरम्यान, खडसे यांनी आपल्या सोईचे राजकारण करण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. सून एका ठिकाणी, मुलगी एका ठिकाणी, तर ते स्वतः दुसऱ्या ठिकाणी असे सोईचे आणि एकाच घरात सत्ता राहणारे, परिवार वादाचे राजकारण त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांचे म्हणणे बरोबर आहे. शरद पवार यांना पश्चात्ताप होणारच आहे, असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा”

सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीचा मोठा निर्णय; सांगलीची जागा मिळाली ‘या’ पक्षाला

“सांगलीची जागा काँग्रेसची हे जनावर सुद्धा सांगेल”