आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या काही दिवसात तीनवेळा लोकप्रतिनिधींवर जीवघेणे हल्ले झाले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर काल ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरही भाजप कार्यकर्त्यांकडून हल्ला झाला. यासर्व प्रकारांमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राखणं गरजेचं आहे. मला पूर्णपणे खात्री आहे की, देवेंद्र फडणवीस कायदा सुव्यवस्था राखण्यास तत्पर आहेत. महाराष्ट्रात पूर्णपणे लक्ष घालून शांतता राहावी याकरता ते प्रत्येक गोष्ट करतील. , असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
ही बातमी पण वाचा : रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट साईड कडून गोपाळकृष्ण शाळेस संगीत वाद्यांची मदत
निखिल वागळे यांच्यावर खूपदा हल्ले झाले आहेत. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खूप दुरुपयोग करतात. लोकही त्यांच्या अधिकारांची दुरुपयोग करतात. त्यामुळे हे दोन्हींकडून संपायला पाहिजे. निखिल वागळेंनीही मर्यादित राहिलं पाहिजे आणि लोकांनीही आक्रमक होऊ नये., असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.
महत्त्वाच्या घडामोडी –
बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार द्या; राज ठाकरे यांची केंद्र सरकारकडे मागणी
“ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी ‘त्या’ व्यक्तीला केली अटक”
“ब्रेकींग न्यूज ! ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू”