मुंबई : कोरोना विषाणूच्या संकटामुळे मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी यंदाचा उत्सव कोविड-19 च्या आरोग्य विषयक काळजी घेऊन साजरा करावा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.
यंदाचा उत्सव मर्यादित स्वरुपात साजरा होत असला, तरी पुढील वर्षी मात्र गेल्यावर्षीच्या उत्सवापेक्षा अधिक उत्साहात आणि भव्य-दिव्य असा साजरा करण्याचे प्रयत्न करूया, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
कोरोना विषाणूचे सावट असल्याने यंदा सार्वजनिक गणेश उत्सवाच्या स्वरुपावर मर्यादा येईल. त्यामुळे यंदा उत्सव मंडळांनी मूर्तींची उंची लहान ठेवण्याबाबत विचार करावा. प्रत्येक छोट्या – मोठ्या गोष्टींचे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव आणि त्याला रोखण्यासाठीच्या उपाययोजनांच्या अंगाने नियोजन करावे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई शहर जिल्ह्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने व्हिसीद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी-
नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी आहेत; राहुल गांधीचे पंतप्रधानांवर टिकास्त्र
जितेंद्र आव्हाड यांचा नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले…
“माउलींच्या पादुका नेणाऱ्या हेलिकॉप्टरचा खर्च उचलण्यास शिवसैनिकाची तयारी”
चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली; संजय राऊतांची पंतप्रधानांवर टीका