मुंबई : बिबवेवाडीतील मैदानात कबड्डी खेळत असताना एका 14 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या घटनेवर मनसे नेत्या रूपाली पाटील यांनी प्रतिक्रिया देत या घटनेचा निषेध केला आहे.
माजी लपले तर आजी झोपले? महिला बालकल्याण मंत्री आहेत का? असा सवाल रूपाली पाटील यांनी यावेळी केला.
हे ही वाचा- भाजपमध्ये आल्यापासून सगळं निवांत, कसलीही चाैकशी नाही, शांत झोप लागते; भाजपच्या ‘या’ नेत्याचं विधान
महाराष्ट्राच नाक, सांस्कृतिक नगरीत कोयत्याने सामूहिक गळा चिरण्याची हिम्मत कशी होते? जरा लाज वाटू द्या. पुण्यात 14 वर्षीय कबड्डी खेळाडू मुलीचा एकतर्फी प्रेमात निर्घृण खून होतो, पुण्य नगरीच्या लेकीला न्याय कधी मिळणार? सदरील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून, आरोपीला शिक्षा व्हावी व अशा प्रकरणात आरोपीचे वकीलपत्र घेताना वकिलांनी ही सर्व सत्य बाजू तपासून वकीलपत्र घ्यावे, असं रूपाली पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, त्या मुलीची एकतर्फी प्रेमात निर्घृण खून करणाऱ्या नराधमाचे आरोपीचे वकील पत्र कोणीही घेऊ नये ही विनंती. वकील बंधू, भगिनींना आरोपींना फास्ट ट्रॅक केस चालवून लवकर शिक्षा व्हावी, हीच त्या लेकराला श्रद्धांजली, असा शोक रूपाली पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्वाच्या घडामोडी –
आगामी काळात भाजप या देशातूनच जमीनदोस्त होणार; नाना पटोलेंचा दावा
पुण्यातील ‘त्या’ घटनेवर अजित पवारांचा संताप अनावर; म्हणाले…