Home महाराष्ट्र भाजप – राष्ट्रवादीचं सोडा; पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत आता अभिजित बिचुकलेंची एन्ट्री

भाजप – राष्ट्रवादीचं सोडा; पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत आता अभिजित बिचुकलेंची एन्ट्री

मुंबई :  राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने पंढरपूर विधानसभा इथे पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीकडे भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ  यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात भाजपने समाधान आवताडे यांना मैदानात उतरवलं आहे, अशातच  पंढरपूर पोटनिवडणुकीच्या रिंगणात आता अभिजित बिचुकले यांनी उडी घेतली आहे.

अभिजित बिचुकले यांचा सामाजिक, राजकीय, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील वावर कायम चर्चेचा विषय असतो. आतापर्यंत बिचुकले यांनी लोकसभा, विधानसभा अगदी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक लढवून झाली आहे.

बिचुकले यांच्या उमेदवारीमुळे पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारात रंगत येणार आहे. ते लवकरच आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

दरम्यान, विठुरायाच्या नगरीची झालेली दुर्दशा बघवत नाही. राज्यातील उद्दाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी मी ही निवडणूक लढवत असल्याचे बिचुकले यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

पवारांची तब्येत बिघडली माहित आहे, पण सरकारचं माहित नाही- चंद्रकांत पाटील

ईडीकडून चौकशीची तारीख आली की एकनाथ खडसे यांना कोरोना होतो- गिरीश महाजन

“काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”

संजय राऊत हे चंद्रावर, सुर्यावर, मंगळावर कशावरही भाष्य करु शकतात; चंद्रकांत पाटलांचा टोला