मुंबई : माजी आमदार राजीव आवळे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.
जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तीनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु, असं सांगतानाच येत्या काळात अनेक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, आघाडीचे सरकार येणार नाही, असे समजून अनेक नेते तिकडे गेले होते. पण आता त्यांनाही आपण आघाडी सोडून का गेलो? असं वाटायला लागलं आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी-
“जळगावचे सुपुत्र BSF जवान अमित पाटील यांना वीरमरण”
उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी, तर आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यायला हवा- किरीट सोमय्या
थुंकू नका लिहिलेलं असलं तरी लोकं तिथेच थुंकतात, ठाकरे सरकारचंही असंच झालंय- नितेश राणे
पक्षवाढीसाठी चंद्रकांत पाटलांचा राज ठाकरेंना ‘हा’ मोलाचा सल्ला