नवी दिल्ली : महाराष्ट्राने भीती मारली. महाराष्ट्राने देशाला दिशा दिली. आता देशातील इतर राज्यातील नेते ही म्हणत आहेत की ये हमारे यहा भी हो सकता है, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
महाराष्ट्रात जे परिवर्तन झालं त्या परिवर्तनाने देशाच्या राजकारणाला नवी दिशा देण्याचं काम केलं आहे. महाराष्ट्रानंतर आता देशात सुध्दा अनेक ठिकाणी राजकीय परिवर्तनाला दिशा मिळू शकते. ही एक परिवर्तनाची सुरूवात होईल, असं संजय राऊत म्हणाले.
दिल्लीत अधिवेशनासाठी जमलेल्या महाराष्ट्रातील खासदारांच्या स्नेह भोजनावेळी संजय राऊत यांनी सर्व खासदारांशी संवाद साधला. यावेळी राऊतांनी अनेक किस्से सांगितले.
दरम्यान, आमचा शरद पवार यांच्यावर विश्वास होता. शरद पवार यांनी ठरवलं तर ते काहीही करू शकतात, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत फाडली विधेयकाची प्रत
” राज्यात सुरु केलेल्या योजना भाजपच्या भल्याच्या नाही तर राज्याच्या भल्याच्या”
रामदास आठवले मुर्ख आहेत, तळवे चाटूनच त्यांनी पदं मिळवलीत- आनंदराज आंबेडकर
निलेश राणे यांनी केली विनायक राऊतांवर आक्षेपार्ह पोस्ट