“कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं दु:खद निधन”

0
514

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं दु:खद निधन झालं. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हे ही वाचा : “मोठी बातमी! उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात”

गेल्या काही दिवसांपासून हैदराबादमध्ये चंद्रकांत जाधव यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तसेच पहिल्याच निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत विजय मिळवला होता.

महत्वाच्या घडामोडी –

चिंता वाढली! हाय रिस्क देशातून आलेले 6 जण कोरोना पाॅझिटिव्ह, ओम्रिकाॅन चाचणी अहवालाची प्रतिक्षा

भाजप हा पक्ष जाता जाता सर्व काही विकून जाईल; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

केंद्राला न जुमानता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here