दुबई : आजच्या आयपीएलच्या राॅयल चैलेंजर्स बेंगलोर विरूद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबचा शेवटच्या चेंडूवर राॅयल चैलेंजर्स बेंगलोरचा 8 विकेट्सनी पराभव केला.
राॅयल चैलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावत 171 धावा केल्या. राॅयल चैलेंजर्स बेंगलोरकडून विराट कोहलीने सर्वाधिक 39 चेंडूत 48 धावा केल्या. तर शिवम दुबेने 19 चेंडूत 23 धावा, ख्रिस माॅरिसने 8 चेंडूत 25 धावा, ईशूरू उडाणाने 5 चेंडूत 10 धावा केल्या. पंजाबकडून मोहम्मद शमी, मुरूगन अश्विनने 2, तर अर्शदिप सिंग, ख्रिस जाॅर्डनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करताना किंग्स इलेव्हन पंजाबने हे लक्ष्य शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूवर 2 विकेट गमावत पूर्ण केले. पंजाबकडून कर्णधार राहूलने सर्वाधिक 49 चेंडूत 61 धावा केल्या. तर युनिव्हर्सल बाॅस ख्रिस गेलने 45 चेंडूत 53 धावा केल्या. बेंगलोरकडून युझवेंद्र चहलने 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी-
उद्धव ठाकरेंना गजनी म्हणणाऱ्या नेत्याला शिवसेनेचं प्रत्युत्तर
पोलिसाला मारणे पडले महागात; मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने सुनावली ‘ही’ शिक्षा
हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, तर मग राज्यातील सर्व मदरसे बंद करा- अतुल भातखळकर