Home देश किरीट सोमय्यांचा दिल्ली दौरा; वाढवणार महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अडचणी?

किरीट सोमय्यांचा दिल्ली दौरा; वाढवणार महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अडचणी?

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोपांच्या फैऱ्या झाडल्या. हसन मुश्रीफ, भावना गवळी, अजित पवार, आनंदराव अडसुळ आणि आता अर्जून खोतकर यांच्यावर सोमय्यांनी आरोप केले. आता याच पार्श्वभूमीवर सखोल चौकशी करावी, यासाठी सोमय्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यासंदर्भात सोमय्या यांनीच ट्विटरवरून माहिती दिली.

हे ही वाचा : “भाजपचा राष्ट्रवादीला दे धक्का; मोठ्या नेत्यासह काही नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश?”

आजच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान किरीट सोमय्या हे हसन मुश्रीफ,भावना गवळी, अजित पवार, अर्जून खोतकर आणि आनंदराव अडसूळांच्या घोटाळ्याची चौकशी संबंधित विभागात करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आता सोमय्यांच्या ट्वीटमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“जळगावमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, 20 जागांवर महाविकास आघाडी विजयी, रोहिणी खडसेंचा एकतर्फी विजय”

“विधानसभा निवडणूकीपू्र्वी भाजपला मोठा धक्का; ‘या’ नगरसेवकानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला धक्का; चार कार्यकारी सोसायटीत एकनाथ खडसेंचं सहकार पँनेल विजयी