मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केला आहे. आयकर विभागाने भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची 100 कोटींची मालमत्ता जप्त केल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तापसे यांनी प्रतिक्रिया दिली.
भाजपचे नेते सतत महाविकास आघाडीतील नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर किरीट सोमय्यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा, अशी जोरदार टीका महेश तापसे यांनी यावेळी केला.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा, परंतु दुर्दैवाने तोही धंदा चालणार नाही कारण त्यांची भविष्यवाणी फोल ठरते, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. @ChhaganCBhujbal@maheshtapase @KiritSomaiya pic.twitter.com/qAP8HlWjwY
— NCP (@NCPspeaks) August 25, 2021
दरम्यान, छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांची 100 कोटींची बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याचं सोमय्या म्हणाले होते. मात्र या इमारतीचे मालक अर्शद सिद्दीकी यांच्या मालमत्तेच्या व्यवहारात छगन भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबाचा काहीही संबंध नसल्याचं महेश तापसे यांनी म्हटलं आहे.
@KiritSomaiya जी ने सन्माननीय मंत्री @ChhaganCBhujbal जी पर जो अल जेब्रिया कोर्ट के संदर्भ में १०० करोड़ की बेनामी मालमत्ता को जब्त किये जानेका आरोप किया हैं, वह पूर्ण रूप से गलत, आधारहीन और तथ्यहीन हैं।@NCPspeaks
— Mahesh Bharat Tapase महेश भारत तपासे (@maheshtapase) August 25, 2021
महत्वाच्या घडामोडी –
देश कायद्याने चालतो, दोन्ही निकाल माझ्या बाजूनेच- नारायण राणे
“नारायण राणे सत्तेच्या जोरावर तत्वज्ञान पाजळत होते, कालच्या प्रकाराने त्यांची गुर्मी उतरवली”
राज्यामध्ये आता राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग- नितेश राणे
“जामीन मिळताच नारायण राणेंना दुसरा धक्का, पुन्हा अटक होणार?”