किरीट सोमय्या 26 ऑक्टोबरला नांदेड दौऱ्यावर, सचिन सावंत म्हणतात…

0
383

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांमागे सध्या ईडी, सीबीआयसह अन्य केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या येत्या 26 आणि 27 तारखेला नांदेड दौऱ्यावर जाणार आहेत. तशी माहिती खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. त्यावर आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

किरीट सोमय्या यांनी 21 ऑक्टोबरला ट्वीट करुन आपण 26 आणि 27 ऑक्टोबरला नांदेड आणि लातूरला जाणार असल्याची माहिती दिली होती. ‘सोमय्यांच्या या ट्वीटला उत्तर देताना सचिन सावंत यांनी सोमय्याजी, आपण 26 ला नांदेडला येणार असं कळतंय. मी अगोदरच आलोय. नांदेडमध्ये तुमचं स्वागत आहे’, असं ट्वीट केलंय.

हे ही वाचा : “आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ, प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पोहचल्याच नाहीत”

महत्वाच्या घडामोडी – 

 आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी भाजपने हिंदू-मुस्लीम वाद निर्माण केला; नाना पटोलेंचा आरोप

भाजपचे 18 लोक शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी भेटून गेलेत; संजय राऊतांचा मोठा गाैफ्यस्फोट

गेट वेल सून’ राज ठाकरेजी, आतातरी तुम्ही मास्क वापरा; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची विनंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here