आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी किरीट सोमय्या यानी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. यानंतर कोल्हापुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीची नोटीस बजावली आहे. सोमय्या यांच्या घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. किरीट सोमय्या यांच्या घरासमोर पोलिसांचा ताफा वाढल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचा निषेध केला.
सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आमचा राज्य सरकारविरोधातील संर्घष सुरुच राहणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची माहिती घेण्यासाठी मी कोल्हापूरला जाणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला अटक करण्यासाठी माझ्या घरात डझनभर पोलीस पाठवले आहेत. मला गणेश विसर्जनासाठीही जाऊ दिले जात नाही, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
We strongly condemn the illegal detention of Former MP @KiritSomaiya ji & we will continue to our fight against MVA.
माजी खा. किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो.
राज्य सरकारविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील.#KiritSomaiya— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 19, 2021
महत्वाच्या घडामोडी –
सेना-भाजप युतीवर केंद्रीय मंत्री डाॅ.भागवत कराड यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
“…म्हणून किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात नो एन्ट्री”
“…म्हणून किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात नो एन्ट्री”
जगातील सर्वोत्तम मुख्यमंत्री; कंगना राणौतचा उद्धव ठाकरेंना टोला