आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी किरीट सोमय्या यानी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. यानंतर कोल्हापुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीची नोटीस बजावली आहे. मात्र तरीही सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला जाण्यासाठी सीएसटीवर पोहचले.
सीएसटी रेल्वेस्थानकावर पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेरले होते. सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेत पोलिसांना, ‘तुम्ही मला अडवू शकत नाहीत, माझ्यावरील कारवाई बेकायदेशीर आहे’ असे म्हणत कोल्हापूरला आपण जाणारच असे बजावले.
दरम्यान, सोमय्या हे बराच वेळ पोलिसांचा कचाट्यात सापडले होते. तसेच ‘तुम्ही मला कोल्हापूरच्या वेशीवर अडवू शकता, इथे मुंबईत नाही’ असं म्हणत सोमय्या गाडीत बसले.
Started from CSTM by Mahalakshmi Express, hope for Ambemai Aashirwad
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 19, 2021
महत्वाच्या घडामोडी –
कोंबडं कितीही झाकलं तरी…; किरीट सोमय्यांना आलेल्या नोटीसवरून प्रवीण दरेकर आक्रमक
सरकारच्या दडपशाहीला भाजपा घाबरत नाही; सोमय्या यांच्या नोटीसवरून चंद्रकांत पाटलांची टीका
किरीट सोमय्या मुंबईत स्थानबद्ध! देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
सेना-भाजप युतीवर केंद्रीय मंत्री डाॅ.भागवत कराड यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…