किरीट सोमय्या म्हणजे भाजपची ‘आयटम गर्ल’; नवाब मलिक यांचं वादग्रस्त विधान

0
294

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी बोलताना महाविकास आघाडीवर सातत्याने हल्लाबोल करणार भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

किरीट सोमय्या यांनी मंत्रालयात जाऊन नगरविकासाच्या फाईली पाहिल्या. यावरून नवाब मलिक यांनी सोमय्यांवर जोरदार टीका केली. मलिक यांनी सोमय्यांची तुलना थेट बाॅलिवूड सिनेमातील आयटम गर्लशी केली आहे. ते नांदेडमध्ये माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : धनंजय मुंडेंनी अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर केला; पंकजा मुंडेंचा घणाघात

किरीट सोमय्या राजकीय क्षेत्रात भाजपच्या आयटम गर्ल सारखं काम करत आहेत. बातमी कशी होईल यासाठी आयटम गर्लचा कार्यक्रम सुरू आहे, असं वादग्रस्त विधान नवाब मलिक यांनी केलं आहे. मलिक यांच्या या वादग्रस्त विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, बॉलिवूडमध्ये एखादा सिनेमा चालवण्यासाठी आयटम गर्लची गरज लागते. मला वाटतं किरीट सोमय्या राजकीय क्षेत्रात भाजपच्या आयटम गर्ल सारखं काम करत आहेत. बातमी कशी होईल यासाठी आयटम गर्लचा कार्यक्रम सुरू आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीचं काँग्रेसला मोठं खिंडार, मालेगावमध्ये 27 नगरसेवक करणार राष्ट्रवादीत प्रवेश

नगरपंचायत निवडणुकीतील अपयशामुळे उद्धव ठाकरे हताश झालेत, त्यामुळे…; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीत 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार; अण्णा हजारेंची अमित शहांकडे चौकशीची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here