मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोपांची मालिका चालूच ठेवली आहे. आधी 11 जणांवर आरोप केल्यानंतर सोमय्यांनी यामध्ये आता आणखी एका मंत्र्यांचं नाव घेतलं आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियांनी कोट्यवधींचे घोटाळे केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. 127 कोटींचे पुरावेही आपल्याकडे असल्याचं सोमय्या म्हणाले.
ठाकरे सरकारच्या डर्टी इलेव्हनची नावं मी जाहीर केली होती. दुर्दैवाने राखीव नावं आहेत. प्रताप सरनाईक, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड, यशवंत जाधव, यामिनी जाधव, अनिल परब, अनिल देशमुख, यांची नावं होती. आता यामध्ये राखीव खेळाडूंचाही समावेश झाला आहे, असं सोमय्या यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच, वंचितचा ‘हा’ मोठा नेता बांधणार हाती घड्याळ”
कोकणातील घडामोडींना वेग; आता नारायण राणेंची जागा निलेश राणे लढवणार?
“साताऱ्यात शशिकांत शिंदेंचा शिवेंद्रराजे भोसलेंना मोठा धक्का; अनेक समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”
उत्तरप्रदेश निवडणूकीत ‘आप’ सर्व जागा लढवणार