Home महाराष्ट्र कोकणातील घडामोडींना वेग; आता नारायण राणेंची जागा निलेश राणे लढवणार?

कोकणातील घडामोडींना वेग; आता नारायण राणेंची जागा निलेश राणे लढवणार?

सिंधुदुर्ग : नारायण राणे यांना भाजपने केंद्रीय मंत्रिपद दिल्यानंतर आता कोकणातील राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत.

नारायण राणे यांनी विधानसभेत  ज्या मतदारसंघाचं नेतृत्त्व केलं, आता त्याच कुडाळ मालवण मतदारसंघासाठी माजी खासदार निलेश राणे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदारसंघातून निलेश राणे हे निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे.

दरम्यान, कुडाळ मालवण विधासभेत सध्या शिवसेनेचे वैभव नाईक हे नेतृत्त्व करतात. वैभव नाईक यांनी 2014 मध्ये दिग्गज नेते नारायण राणे यांचा पराभव केला होता.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवारांनी काँग्रेसमध्ये येऊन ताकद वाढवावी ही भूमिका योग्यच- विजय वडेट्टीवार

मी भाजपची पैशांची ऑफर न घेता पक्षात आलोय; ‘या’ भाजप आमदाराचा खुलासा

“सांगलीत उद्या कृष्णा नदीची पाणी पातळी 25 ते 27 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता”

“साताऱ्यात शशिकांत शिंदेंचा शिवेंद्रराजे भोसलेंना मोठा धक्का; अनेक समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”