Home महाराष्ट्र आंदोलनावरून खोत-शेट्टी भिडले, खोत म्हणतात, ‘हे काजू शेट्टी’ तर शेट्टी म्हणाले, ‘खोत...

आंदोलनावरून खोत-शेट्टी भिडले, खोत म्हणतात, ‘हे काजू शेट्टी’ तर शेट्टी म्हणाले, ‘खोत भ्रमिष्ट झाले’

सांगली : महायुतीच्या वतीने आज राज्यभर दूध दरवाढीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनावरून माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर सदाभाऊ खोत यांनीदेखील राजू शेट्टीं यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

राजू शेट्टी आता हे काजू शेट्टी झाले आहेत आणि या भंपक माणसाला आता कोणी किंमत देत नाही. तसेच त्यांची अवस्था आता गावात देवाला सोडलेल्या वळू प्रमाणे झालेली आहे. शेतकऱ्यांनी शेट्टी यांना रेड्याप्रमाणे सोडलं आहे. त्यामुळे आता काय करावं आणि काय नाही, हे सुचत नाही. तसेच राजू शेट्टी यांनी दूध दराच्या आंदोलनाचं नाटक केले आहे, अशी टीका खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर केली आहे.

दरम्यान, सदाभाऊ खोत यांचं आंदोलन फसलं. त्यांच्या आंदोलनाचा फज्जा उडाला आहे. शेतकऱ्यांचा सहभाग नव्हता त्यामुळेच ते पिसाळले आहेत. आंदोलन केंद्र सरकार विरोधात आहे की राज्य सरकार विरोधात की राजू शेट्टी यांच्या विरोधात आहे ते आधी ठरवा. प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा आलेल्या अपयशाला कोणाला तरी जबाबदार धरण्यासाठी भ्रमिस्थासारख बोलले असावेत, असं राजू शेट्टी यांनी खोतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

हे सरकार आंधळ्याचे, मुक्याचे आणि बहिऱ्यांचे सरकार असून….; सदाभाऊ खोत यांची राज्य सरकारवर टीका

“महाविकासआघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका”

सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

भाजपचे 40 आमदार आमच्या संपर्कात- बच्चू कडू