Home पुणे “महाराष्ट्राच्या खलीला तुमच्या मदतीची गरज; मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी फेसबुक...

“महाराष्ट्राच्या खलीला तुमच्या मदतीची गरज; मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट करत का केली विनंती?”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी हात जो़डून लोकांना आर्थिक मदतीची विनंती केली आहे. तसेच ही मदत त्यांनी स्वत:साठी नाही तर एका 40 वर्षांच्या व्यक्तीसाठी केली आहे.

हे ही वाचा : महाविकास आघाडीवर टीका करताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची जीभ घसरली, म्हणाले…

महाराष्ट्राचा खली अशी ओळख असलेले श्री.उमेश रमेश वसवे यांच्या मदतीसाठी वसंत मोरे यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी फेसबुक पोस्ट करत लोकांना मदतीचं आवाहन केलं आहे.

वसंत मोरे काय म्हणाले फेसबुक पोस्टमध्ये पहा:

महाराष्ट्राच्या खलीला गरज तुमच्या मदतीची…हा आहे कै.सोनेरी आमदार रमेशभाऊंचा अंगरक्षक श्री.उमेश रमेश वसवे राहणार सिंहगड वसवेवाडी, वय अवघे ४० उंची तब्बल ७ फूट वजन १६५ किलो अशी प्रचंड शरीर संपत्ती लाभलेला उमेश गेल्या २ वर्षांपासून आजाराने व्यापलाय… होतं नव्हतं ते सगळे जगण्याच्या धडपडीत गमावून बसलाय…लोकांना सुरक्षा देणारा खली आज जगण्यासाठी ढसाढसा रडताना पाहिलाय… पुण्यातील एका नामांकित बिल्डरने त्याचे कष्टाचे पैसे बुडवलेत, मी त्या बिल्डरला फोन केला तर पैसे नाहीत बोला…ठीक आहे त्याला थोडा सवडीने बघतो…पण मित्रांनो हा उमेश म्हणजे आपल्या महाराष्ट्राची संपत्ती आहे…जर त्याने या महिन्यात त्याच्या गळ्यावर आणि पाठीवर शस्त्रक्रिया केली नाही तर कदाचित ही आपली मराठी माणसाची संपत्ती मातीत ही मिळेल, त्याचे नाशिकला ऑपरेशन करायचे आहे, तेव्हा माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे उमेश ला जमेल तशी यथाशक्ती मदत करा… तुमचे १०० ते ५०० रु. सुद्धा हा धिप्पाड मराठी देह वाचवू शकतात…कारण ही असली माणसं परत परत जन्म घेत नाही. तेव्हा प्लीज मदत करा…त्याचा गुगल पे नंबर :- 8484844343

महत्वाच्या घडामोडी –

चिरीट तोम्मया, आमदार शिवसेनेला मतदान करतीलच, पण तुमच्यावर…; दिपाली सय्यद यांचा सोमय्यांवर हल्लाबोल

पुणे मनसेला पुन्हा हादरा; ‘या’ नेत्याचा पक्षाला रामराम

“…पण असा घाबरणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला परवडणार नाही”