मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने घंटानाद आंदोलन केलं आहे. यावरून शिवसेना खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धार्मिक स्थळे उघडल्यानंतर फिजिकल डिस्टन्सिंग राबवायचे हे लोकांना कळतं, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पण भाजपतर्फे जे घंटानाद आंदोलन झालं त्याची छायाचित्रे पाहिल्यावर या डिस्टन्सिंगची कशी जोरदार काशी झाली आहे हे समजलं, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी सामनातून केला आहे.
दरम्यान, लोकांना मनःशांती व पोटशांती हे दोन्ही मंदिरांच्या माध्यमातून मिळायला हवी, पण कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला तर त्याची जबाबदारी विरोधी पक्ष घेणार आहे काय? असा सवाल देखील संजय राऊत यांनी सामनातून उपस्थित केला.
महत्वाच्या घडामोडी-
नाणार प्रकल्पाबद्दल शिवसेना बोलायलाही तयार नव्हती पण आता…; निलेश राणेंचं शिवसेनेवर टिकास्त्र
सांगलीतील कोरोना मृत्यूचे प्रमाण देशात सर्वाधिक- देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारने आता अँटीबॉडी टेस्टवर जास्त भर द्यावी; मनसेची मागणी
न्याय की चक्की थोडी धीमी ज़रूर चलती है, पर…; सुशांत सिंग प्रकरणावर अमृता फडणवीसांच ट्विट